माझ जीवन परिचय **माझे जीवन गाणे**

18 जाने 19X9
बुधवार चा दिवस, दिवस संपला सूर्य मावळला , आणि चंद्राने सूर्या चा चेहरा बघितला म्हणजे माझा,
मी सूरज, 🙏
माझ्या पेक्षा दोन अजून मोठे भाऊ, पंकज आणि नीरज
मी लहान  धाकटा असल्या मुळे, "" नवीन "" काही माझ्या जिवनात  लवकर येत च नव्हत,
सायकल जुनी, पुस्तके जुनी, शाळा तिघांची सारखी म्हणजे तिच
राणी राज कुँवर प्राथमिक शाळा, चंद्रपूर.
त्यानंतर उच्च प्राथमिक लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर.
कॉलेज बघितली पण गेलो नाही.
10 वी पास होणे नशिबात होत, पण 11 वी चि भीती वाटायची.
सगळे सोबती मित्र सायन्स मध्ये होते, पण मी आपल्या कर्तृत्वाने कॉमर्स मध्ये समाधान मानले.
आपण कॉमर्स मध्ये कशाला एकटे जावे म्हणुन कॉलेज च सोडले
आणि बाबांच्या पारंपरिक व्यवसाया मध्ये जुड़ लो.
1994 ते आज पर्यंत ती सहल सुरूच आहे.

करियर :-
व्यावसायिक कुटुंब असल्याने व्यवसायाचे ज्ञान सर्वांकडून घरी मिळत च होते.

व्यवसायांत सर्वांची मेहनत आणि लगन बघून देवानी कधी  पाठ फिरवली नाही, जेव्हढी मेहनत तेवढी प्रगती हेच समाधान मानुन 
"" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ ""

संगीत प्रेम :-
संगीत आयुष्यात आले तेही व्यावसायिक मार्गा ने दोन पिढ्या नी
LP रेकॉर्डस, Gramophone, आणि नंतर ऑडिओ कॅसेट्स, विक्री चा व्यवसाय मांडला. 
मला लाभले ते सीडी, डीव्हीडी, आणि 3rd generation म्हणजे pen drive विकायची संधी , 
Digital युग आला ध्वनीफित चा व्यवसाय संपला, आधुनिक युगात मोबाईल चे व्यवसाय शुरू झाले. सध्या हेच continue. 

Audio कॅसेट्स विकता विकता, जगजितसिंह, किशोर कुमार, मोहम्मद रफ़ी, यांच्या शी रोज चीच ओळख झाली.
त्याचा आवाज ओळखणे हा माझा लहान पणी चा खेळ,
त्यांच्या आवाजाची, गाण्या चि नक्कल करणे, त्या गायकी वर आपण प्ले बॅक करणे हे नित्या चे प्रयोग,
त्या नक्कला तुन केंव्हा गळ्यात आवाज पण आली हे कळले च नाही.
गीत संगीत होते ते मनातल्या मनात,  पुढे आपल्या सारखे संगीत प्रेमी मिळत गेले. आणि मनातले सूर पुन्हा गळ्यात रुजू झाले.

आता सरस्वती ची कृपा केंव्हा होणार माहीत नाही. 

ना सूर है ना सरगम है, ना लय ना, तराना है,
ब्राह्मण एकता संगीत मे रोज एक गाना जरूर गाना है. 


कलाकार जसा जन्माला यावा लागतो ना तसा रसिक ही जन्माला यावा लागतो. तेंव्हाच तर सजते  संगीताची खरी महफिल. 

आपल्या सर्वांच् आभार, 🙏 अभिनन्दन 🙏 

Comments

Popular posts from this blog

एसपी बाला सुब्रमण्यम

व्यापारी जागरुकता संदेश

lock down chandrapurkar